पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे सहावे स्वरपुष्प राम आणि बजरंग विधाते बंधू यांनी गुंफले.
सुरुवातीला मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री .मुकेश आणेचा बजरंग विधाते राम विधाते राजाभाऊ तेलतुमडे.राजू पिटले.राजकुमार कुलकर्णी यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी सुरू करत रुप पाहता लोचणी.सुंदर ते ध्यान कानडा विठ्ठल.देहाची तिजोरी.इंद्रायणी काठी.जन्मोजन्मी आम्हीं बहु पुण्य केले.आणि गवळणी लंगडा ग लंगडा.मुरलीवाले.कान्हा रे जगजेठी सुंदर गवळणी सादर करत कार्यक्रमाची सांगता लय नाही लय नाही मागणं या भैरवी ने सांगता केली सर्व पंढरपूरकर रसिक मोठ्या संख्येने शेवट पर्यंत श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्यांना सुंदर साथसंगत तबला कृष्णकुमार विधाते हार्मोनियम राम विधाते पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे.व्हायोलीन डॉ सुरेश विधाते.टाळ अक्षय तळेकर यांनी केली.तर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.
पुढेही दररोज सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.