भाळवणी प्रतिनिधी
आज दिनांक ०४/१०/२०२४ वार शुक्रवार रोजी वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी येथे स्वर्गीय हरिशचंद्र फाउंडेशन यांच्या वतीने फाउंडेशनचे ट्रस्टी व मुंबई येथे महानगरपालिका शाळेत शिक्षक म्हणुन सेवेत असणारे कृष्णात गायकवाड व त्यांच्या पत्नी मनीषा गायकवाड यांनी प्रशालेतील गरजु व गरीब विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यानंतर प्रशालेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व प्रशालेचे मुख्याध्यापक एस एल काळे यांनी आपले प्रस्ताविकपर थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
यानंतर गायकवाड यांनी आपल्या स्वर्गीय हरिशचंद्र फाउंडेशन विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करताना सांगितले की या फाउंडेशनच्या माध्यमातुन आता पर्यत विविध ठिकाणी गरजु व गरीब विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे व याचे समाधान शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे असे सांगितले.
या नंतर प्रशालेतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंत शिकत असलेल्या गरजु व गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना मानवरांच्या हस्ते विविध प्रकारचे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक एस.एम.चौगुले यांनी केले तर आभार प्रशालेचे सहशिक्षक ए.एम.गायकवाड यांनी व्यक्त केले
हा सुंदर असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस.एल.काळे व प्रशालेतील सहशिक्षक व सहशिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामुळे हा अतुलनीय कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडला.