पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये १७९ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण ८ कोटी २१ लाख ८९ हजार ९११ रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे यांनी दिली.
या लोकअदालतीसाठी एकुण ६ पॅनलची व १ नियमित न्यायालयाचे व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा न्यायाधीश श्री. एस. बी. देसाई, न्यायाधीश श्री. ए. ए. खंडाळे, न्यायाधीश श्री. एन. एस. बुद्रुक, न्यायाधीश श्री. एस. एस. चोपडा, न्यायाधीश श्रीमती एस. एस. राउळ, न्यायाधीश श्रीमती पी. आर. पाटील, न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे यांनी काम पाहिले.
सदरची लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे, न्यायाधीश श्रीमती एस. एस पाखले यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.
या लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.