माढा प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांचे वतीने रोपळे खुर्द येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दत्तक खेडे म्हणून निवडलेल्या रोपळे खुर्द येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
याप्रसंगी गावचे सरपंच वाल्मीक काळे उपसरपंच राहुल पाटील ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर पवार राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत काशीद गावचे समाजसेवक सहदेव साळुंखे, मदन डोईफोडे, तानाजी घोरपडे, प्रा. संकल्प बारबोले, प्रा.शुभम चवरे, प्रा. वैशाली गुंड, सहशिक्षक सोमनाथ गाडेकर, शुभांगी गवळी, व नानासाहेब कोळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत काशीद यांनी केले. तर उपस्थितांना महात्मा गांधीजींचे विचार सध्याच्या काळात सुद्धा कसे गरजेचे आहेत व गावची स्वच्छता कशा पद्धतीने देश विकासासाठी महत्त्वाची असते. असे प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी मार्गदर्शनाद्वारे व्यक्त केले.
त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने सरपंच यांना वृक्ष भेट देण्यात आली. व गावामधून स्वच्छतेसंदर्भात प्रबोधन रॅली काढून महत्व पटवून देण्यात आले. व शेवटी कार्यक्रमाचे आभार सहदेव साळुंखे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील एन.एस.एस.चे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.