सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या, सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स ब्रिजमोहन फोफलिया वतीने २ ऑक्टोबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे प्रमुख पाहुणे डिस्टिक सचिव डॉ अभिजीत जोशी, झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव क्लबचे अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, सेवा सप्ताह प्रमुख लायन नागेश बुगडे, सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, डॉ म्हमाणे, डॉ काळे, एम.जे.एफ लायन सौ ममता बुगडे आदि उपस्थित होते. जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जुळे सोलापूरातील जेष्ठ नागरिकाचा सत्कार करण्यात आला.
एम. जे. एफ. माजी प्रांतपाल लायन अरविंद कोणशिरसगी यांच्या जन्मदिनी वॄक्षारोपण असे सेवाकार्य करण्यात आले.. नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि.लायन रविकिरण वायचळ, इंजि.लायन सागर पुकाळे, लायन संतोष जोशी,लायन देवा गायकवाड, लायन सातलिंग शटगार आदि परिश्रम घेतले. तसेच ४ ऑक्टोबर रोजी शुक्रवार रोजी सकाळी ११/०० वाजता चंडक मुनोत हॉस्पिटल पुर्व मंगळवार पेठ सोलापूर येथे मोफत कान,नाक,घसा, स्त्री रोग शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल डॉ लायन नारायणदास चंडक, सिध्देश्वर सहकारी बॅकेचे चेअरमन लायन नरेंद्र गंभीरे, उद्योजक लायन अण्णासाहेब कोतली, डॉ वांंसती मुनोत,यावेळी एम.जे.एफ लायन डॉ राहुल चंडक,डॉ गिरीश चंडक, डॉ तरुण चंडक आदि उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचे जास्ती जास्त नागरिकांनी फायदा करून घ्यावे. असे आव्हान लायन सोमशेखर भोगडे यांनी केले.