पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपुरात उपोषण स्थळी झालेल्या राज्यव्यापी समाजबांधवांच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले
पंढरपूर येथे सुरू असलेले धनगर समाजाच्या उपोषणाच्या अनुषंगाने धनगर समाजातील लोकप्रतिनिधी खालील प्रमाणे कार्यक्रम धनगर समाजाने राबवावेत
1) दिनांक 21 /9 /2024 रोजी पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी धनगर समाज उपोषणास पाठिंबाचे डिजिटल बोर्ड लावावेत तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोर्ड लावावेत.
2) दिनांक 22/9/2024 रोजी आपापल्या मतदारसंघातील खासदार ,आमदार यांच्या घरासमोर जाऊन हालगी वादन करून त्यांना धनगर समाजास पाठिंबा आहे अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून एक पत्र घ्यावे.
3) दिनांक 23/9 /2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी आपापले तालुक्याच्या ठिकाणी मुख्य महामार्गावर रस्ता रोको करायचा आहे.
4) दिनांक 24 /9 /2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी टिळक स्मारक पंढरपूर येथे निर्धार मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत आवाहन केलेले आहे.