पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी ता.पंढरपूर येथिल वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त न्यु इंग्लिश स्कूल भाळवणी येथील विद्यार्थ्यांना शालेय पॅड व खाऊ वाटप करण्यात आला.
न्यु इंग्लिश स्कूल भाळवणी येथिल विद्यार्थ्यानी वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे क्षेत्र भेट दिली . यावेळी मुला- मुलींना फिटर, वेल्डर, सोलर टेक्नीशियन, कोपा, मोटार मॅकॅनिकल , विजतंत्री, या व्यवसाय ट्रेड विषयी माहिती देण्यात आली.
आय. टी. आय. चे प्राचार्य संतोष गुळवे यांनी विद्यार्थांनी व्यवसाय शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे , असे सांगुण विद्यार्थांनी विविध कौशल्य आत्मसात करून स्वःताची प्रगती करावी तसेच मुलींनी व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व समजून प्रत्येक क्षेत्रात् सहभागी झाले पाहिजे असे सांगितले .
तसेच MKCL बोर्ड सोलापूर येथील शेखर अडगळे यांनी सायबर सेक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी न्यु इंग्लिश स्कूल भाळवणी चे एस. जी . जरे , आर. एम . दडस व बाबर मॅडम व आय . टी आय. चा सर्व निदेशक स्टाप उपस्थितीत होता.