पुळूज येथे स्तुत्य उपक्रमास सरपंच विश्वास महाडिक यांची उपस्थिती
पुळूज प्रतिनिधी तेज न्यूज
लेक असते आई बापाचे सर्वस्व लेकीच्या पाऊल खुणांनी घराचे होते स्वर्ग घरात मुलीचा जन्म होणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. लक्ष्मी मातेच्या रूपात ती आपल्या घरी येते असं हिंदु संस्कृतीमध्ये मानलं जातं. मुली घरात सर्वांच्याच लाडक्या असतात. अशाच लाडक्या लेकीचा इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी सुरभी दत्तात्रय पांढरे, हिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त पुळुज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व शिशि पेन्सिल लोकनियुक्त सरपंच विश्वास (भैया) विष्णुपंत महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. सुरभी पांढरे हिचा वाढदिवस शाळेच्या विद्यार्थ्यासोबत केक कापून करण्यात आला.पुळूज गावातील कुठल्याही कार्यक्रमासाठी सरपंच विश्वास महाडिक आवर्जून उपस्थिती लावतात . यावेळी लोकनियुक्त सरपंच विश्वास (भैया ) महाडिक, माजी सरपंच लक्ष्मण पांढरे, बागायतदार अश्रुभान येळे, ग्रामपंचायत सदस्य नागु दादा वाघमोडे, शाळेचे उपाध्यक्ष संतोष भोसले, शाळा व्यवस्थापन समिती मा अध्यक्ष दत्तात्रय पांढरे ,मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, शिक्षक विठ्ठलराव टाकळे,माडे सर ,पवार सर,राठोड सर ,भुई सर ,उपस्थित होते.