प्रतिकुल परिस्थितीत जिद्द व कष्टाने यशाचे शिखर सर करावे -साजन बेंद्रे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि कष्टाने यशाचे शिखर सर करावे असे प्रतिपादन गीतकार, सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी केले. ते वाडीकुरोली येथील वसंतराव काळे शैक्षणिक संकुलामध्ये कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या भव्य रील्स स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
गीतकार साजन बेंद्रे लोककलावंत, सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते महादेव देठे हे होते.
या कार्यक्रमास सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी संचालक सुधाकर कवडे, अर्जुन जाधव, रामभाऊ बागल, बाळासाहेब नागटिळक, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणीचे संचालक परमेश्वर लामकाने, अरुण नलावडे,अमोल माने, राजाभाऊ माने, सुरेश देठे सहकार शिरोमणी परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना साजन बेंद्रे म्हणाले की, आयुष्यात यशस्वी व्हायचा असेल तर शैक्षणिक प्रगती होणे गरजेचे असून शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रात जिद्द चिकाटी व मेहनतीने यश मिळवता येते यासाठी कष्टाची तयारी असावी असे सांगून विद्यार्थ्यांनी फर्माईश केलेल्या लोकगीतांचे गायन करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कल्याण काळे यांनी सांगितले की वाढदिवसाच्या निमित्ताने तरुण सहकारी मित्रांनी गाव- खेड्यातील गुणी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रिल्स स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले आहे हे अत्यंत कौतुकास्पद असून या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकार पुढे येण्यास मदत झाली आहे.
या रील स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून दूर्वा अभिजीत मुळे व पियुष सजगाणे, द्वितीय क्रमांक विभागून आयुध अभिजित मुळे व संचिता गणेश हरपुडे तृतीय क्रमांक विभागून अस्लम शेख व संकेत कौलगे यांनी प्राप्त केला उत्तेजनार्थ रोहन लालगुडे, तुषार शितोळे, ऐश्वर्या शेलार, कुमार गायकवाड . सर्व यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
यावेळी कोमल पाटोळे,सुधाकर कवडे, रामभाऊ बागल याची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक शब्बीर शेख यांनी मांडले