पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या भंडीशेगांव संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पंढरपूर येथील सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे जेष्ठ सभासद यांचे हस्ते प्रतिमापूजन करुन सुरु करण्यात आली.
प्रतिभादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव काळे यांनी सन 2023-24 चे आर्थिक वर्षाचा अहवाल वाचन केले. त्यावेळेस सभासद, कर्जदार यांना विनंती करुन कर्जदारांनी घेतलेली कर्जे वेळेत भरुन संस्थेचा आर्थिकस्थर आधिक उंचावेल तसेच सभासदांनी वेळेत भरुन दाव्यांची नामुष्की टाळावी असे काळे यांनी सांगीतले.
व्हा.चेअरमन हरीदास मुजमुले यांनी प्रथम उपस्थित मान्यवर, सभासद यांचे स्वागत करुन राज्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्यु झालेले नागरिक तसेच अहवाल सालात संस्थेचे आजी माजी सभासद, संचालक त्यांचे नातेवाईक, राजकीय नेते, देशाचे संरक्षण करताना वीर मरण पत्करलेले जवान यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. संस्थेचे व्यवस्थापक शिवाजी आगलावे यांनी सभेचे विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सविस्तर केले. त्यास सभासदांनी आवाजी मतांनी मंजुरी दिली.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक जयसिंह देशमुख, विलास जगदाळे, राजसिंह माने, प्रतिभादेवी पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णू यलमार, संचालक इब्राहीम मुजावर, रमेश नागणे, रामचंद्र पाटील, संजय गाजरे, प्रकाश गायकवाड, संजय पाटील, युवराज मोरे, पांडुरंग कौलगे, तानाजी केसकर, पांडुरंग कौलगे, नारायण शिंदे यांचेसह विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रतिभादेवी पतसंस्थेचे संचालक संजय गाजरे यांनी मानले.