पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
( पंढरपूर ) धोंडेवाडी येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त आय.टी.आय मधील प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी, मकरंद वैद्य पंढरपूर , सुभाष नागटिळक कौठळी, नवनाथ भोसले खर्डी, तसेच बोहाळी येथील रहीम शेख , अनिल बाबर , भालचंद्र कुसुमडे व आय टी आयचे प्राचार्य संतोष गुळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फिटर, मोटर मेकॅनिकल, वेल्डर , सोलर टेक्निशियन, कोपा, इलेक्ट्रिशन या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थ्यांना आय.टी.आयचे प्राचार्य संतोष गुळवे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.