पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यातील कॅम्पस इंटरव्यू मधून वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील फिटर, वेल्डर, वीजतंत्री या ट्रेड मधील 41 प्रशिक्षणार्थीची नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.
शालिनी लॅब प्रायव्हेट लिमिटेड जेजुरी व महाले आनंद चाकण,पुणे. या नामांकित कंपनीमध्ये मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांची निवड झाली असून यासाठी यशस्वी ग्रुपचे नाना चौधरी व संजय राखुंडे हे थेट मुलाखतीसाठी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसंतराव काळे आय.टी.आय. कॉलेजच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षण देण्याची परंपरा आयटीआय कॉलेजची कायम राहिली असून त्यामुळेच विद्यार्थ्यांची थेट मुलाखती द्वारे नामांकित कंपनीत निवड झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळत आहे तर अनेक विद्यार्थी आपला स्वतःचा लघु व्यवसाय उभा करून इतरांना रोजगाराची संधी देत आहेत असे प्राचार्य संतोष गुळवे यांनी सांगितले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी प्राचार्य संतोष गुळवे सर्व आयटीआयचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.