गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी सर्व विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार व स्वागत केले. यावेळी विद्यार्थी मनोगत स्वप्नाली बिडवे ,प्रांजली ढेकळे हिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे अनिल बागल हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे उपस्थित होते .शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते कसे असावे याविषयी अनिल बागल यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणामध्ये गणपत मोरे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या विषयी आपले मत व्यक्त केले शिक्षण क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले ,डॉक्टर सर्वपल्ली ,राधाकृष्णन यांचे योगदान कसे आणि किती होते याविषयी गणपत मोरे यांनी अध्यक्ष भाषणामध्ये विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिती भोसले तर आभार प्रणाली मेटकरी हिने मांडले या कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षक सोमनाथ भोईटे ,नियाज मुलाणी, वर्षा मोरे ,शितल बागल ,लीना बागल, मसरुद्दीन पटेल ,संतोष पवार ,दीपक देशमुख, राजेंद्र मोलाने, अजय मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.