परिस्थतीपुढे अभ्यासाची जिद्द ठरली सरस
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या मुलांनी खुप मोठं व्हावं आणि उच्च पदाला गवसणी घालून यशस्वी व्हावं असं प्रत्येक आई वडीलांना वाटत असतं. त्यासाठी आपल्या परिस्थीतीला मागे टाकून ते अमाप काबाड कष्ट करीत असतात. बेताची परिस्थती पाचवीलाच पुजलेली असतानाही आपल्या लेकरांच्या भल्यासाठी संकटांचं हे युध्द लढत असतात. तर आई वडीलांच्या या लढ्याला सकारात्मक प्रितसाद देत आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर उतुंग यश मिळवणाऱ्या मुलांचा नेहमीच गौरव होतो. याचीच प्रचिती आई वडीलांच्या स्वप्नांसाठी अभ्यासाच्या जोरावर डॉक्टरकीची रचना साकारणाऱ्या गुणवंत लेकीमुळे आल्याशिवाय राहत नाही.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रचना बाबासाहेब पवार हिची नुकताच एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नंबर लागला आणि अवघ्या पवार कुटूंबासह रोपळे परिसराला आनंदाचा पारावार उरला नाही. कारण बेताची परिस्थती असतानाही केवळ आई वडीलांच्या कष्टाची जाण आणि अभ्यासातील जिद्दीच्या जोरावर गरीब शेतकरी कुटूंबातील रचनाने हे यश संपादन केले आहे. तिचे हे यश अशा अनेक गरीब कुटूंबातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.
याबाबत बोलताना रचनाने सांगितले कि, आई वडीलांचे कष्ट जाणणाऱ्यांना आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा विश्वसा असणाऱ्यांना यश नक्कीच मिळते. या वाटचालीमध्ये मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या ऋुणातून मुक्त होणे शक्य नाही. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाला आणि सहकार्याला कायम सलामच राहील. रचनाच्या या यशाबद्दल रोपळे येथील अंबीकानगरच्या जय भवानी तरूण मंडळातील सदस्यांनी आणि ग्रमस्थांनी तिचे अभिनंदन केले.
लेकीनं कष्टाचे सार्थक केले....
संसाराचा गाडा हाकताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्या संकटांना तोंड देत आपल्या मुलांच्या भल्यासाठी अधिक काबाड कष्ट सोसावं लागतं. परंतु लेकीच्या डॉक्टरकीच्या या यशामुळे केलेल्या कष्टाचे सार्थक झालं असून लेकीनं मोठ्या जिद्दीतून आणि चिकाटीतून हे यश मिळवले. त्यासाठी शिक्षक, नातेवाईक, ग्रमस्थ यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. समाजातील इतर लेकींनीही रचनाची प्रेरणा घेवून यशाला गवसणी घालावी हिच अपेक्षा आहे.....
बाबासाहेब पवार, सुशिला पवार
रचनाचे आई -वडील, रोपळे ता.पंढरपूर