संत ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी आपल्या अभंगात खूप छान लिहितात,
हे विश्वची माझे घर;
ऐसी मती जयाची स्थिर;
किंबहुना चराचर;
आपणची जाहला....||
शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
शनिवार दि.२१ रोजी गोव्यातील श्री.विठ्ठल भक्तांची मांदियाळी,बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आली,त्यामध्ये सौ.अनुराधा म्हाळशेकर ज्येष्ठ साहित्यिक गोवा;रोहिदास गावकर व्यवस्थापक सातेरी माया दिंडी पथक गोवा;चंद्रकांत सावंत दिंडी प्रमुख सातेरी माया पथक गोवा;कृष्णा म्हाळशेकर सामाजिक कार्यकर्ते साखळी गोवा प्रा.दि.बा.पाटील ज्येष्ठ कादंबरीकार सांगली;श्री धोंडीराम सिद माजी संचालक वारणा बँक,चंद्रकांत निकाडे अध्यक्ष मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर,श्री जालिंदर नांगरे. सचिव राधाकृष्ण भजनी मंडळ घुणकी,श्री बाबुशेठ पांडकर आयुर्वेदाचार्य सासवड डॉ.श्रीकांत पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक कोल्हापूर ई.विठ्ठलाच्या दारी कीर्तनाचा गजर करण्यासाठी विठ्ठल भक्तांची मांदियाळी आली होती,मिळालेल्या वेळात त्यांनी पंढरपूर परिसरातील सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे ला भेट देण्याचे प्रयोजन केले,तब्बल 600 किलोमीटर वरून विठ्ठल भक्तांची मांदियाळी आपल्या प्रशालेस भेट देण्यासाठी येत आहे म्हटल्यावर प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद आनंदून गेला,"साधू संत येती घरा,तोचि दिवाळी दसरा"संतांच्या या वचनाप्रमाणे सर्वांनी गोवेकरांच्या दिंडीचे स्वागत आणि आदरसत्कार करण्याचे नियोजन केले.
तत्पूर्वी गोव्याच्या या पाहुण्यांनी प्रशालेसाठी जवळपास २५ ते ३० काजू,नारळ, सुपारी,आंबा,बॉटल पाम,फणस, जांभूळ अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे भेट म्हणून आणली होती,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले,तसेच प्रशालेतील ग्रंथालयासाठी एक ग्रंथ लॉकर भेट दिला,सनराईज परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित आदर सत्कार करण्यात आला,जेष्ठ साहित्यीक अनुराधा ताई म्हाळसेकर,रोहिदास गावकर तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व जेष्ठ लेखक डॉ.श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून निसर्गरम्य वातावरणातील सर्वांगसुंदर शाळा असं वर्णन सनराईज पब्लिक स्कूल चे केले,सर्व मान्यवरांसह त्यांच्या सोबत आलेल्या ६० ते ७० विठ्ठल भक्तांच्या नाश्ता,व चहा पाण्याची व्यवस्था प्रशालेकडून करून सर्वांचा यथाशक्ती आदर सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले, सर्व मान्यवरांचे आदरातिथ्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी केले,कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश गायकवाड,राम मोकळे,कबीर शेख तसेच सर्व अध्यापिका व कर्मचारी वृंद यांनी केले,आलेल्या सर्व विठ्ठल भक्त मंदियाळीने जाता जाता प्रशालेमध्ये विठ्ठल नामाचा गजर केला,तसेच श्रवणीय अभंग व पाऊली सादर केली.
सकाळीच वरुण राजाच्या आगमनाने गोवेकरांच्या दिंडीचे स्वागत झाले,मात्र कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत पावसाने सहकार्य केले,ही मोठी जमेची बाब ठरली,पर राज्यातून एका ग्रामीण भागातील प्रशालेस इतके मोठे मान्यवर भेट देण्यासाठी आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांकडून प्रशालेचे कौतुक होत आहे.
या पूर्वी ही सनराईज पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस मुंबई,विदर्भ-कोकण,मराठवाडा येथील मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या,शेवटी संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.