शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी प्रतीक्षाच
पुळुज प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक राज्य एक गणवेश धोरणाअंतर्गत यंदाच्या सत्रात समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील सरकारी शाळा विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच सुरू आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक नेहमीच तर दुसरा स्काऊट गाईडचा गणवेश देण्याची घोषणा केली. परंतु कुठल्याही शाळेत अंमलबजावणी झाली नाही. सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश या शासनाच्या धोरणाला यंदा खो बसला आहे.
शाळा सुरू झाली पण जिल्हा परिषदांसह नगरपालिका आणि महापालिकेच्या २ हजार ९२३ शाळा मधील सुमारे २ लाख ८ हजार ९३१ चिमुकल्यांना गणवेशा विनाज शाळेत यावे लागत आहे. तर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील प्रत्येक शाळेतील मुलांना बोट आणि दोन पायमोजे जोड मोफत देण्यात आले असून त्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ९३१ विद्यार्थ्यांना बूट पायमोजे खरेदी करण्यासाठी ३ कोटी ५५ लाख १८ हजार २७० रुपये एकूण खर्च आला आहे. प्रत्यक्षात यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता दोन महिने उलटत आले .
तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नियमित गणवेश वितरित करण्यासाठी अद्याप कापड ही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असून स्वातंत्र्यदिनानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार का,असा प्रश्न पालकाकडून उपस्थित केला जात आहे. समग्र शिक्षाअंतर्गत राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकाच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. गतवर्षीच्या शासन निर्णयानुसार दारिद्र्यरेषेवरील मुलांनाही या गणवेशाचे वितरण करण्यात येत आहे. आता यंदा नियमित गणवेश व स्काऊट गाईडचा गणवेश असे दोन गणवेश देण्यात येणार आहेत.
शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता दोन महिने उलटत आले. तरी विद्यार्थ्यांना नियमित गणवेश वितरित करण्यासाठी अद्याप कापड हे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असून 15 ऑगस्ट रोजी तर विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्यात यावा. सी ओ आधिकरी मनीषा ओहोळ यांनी लक्ष द्यावे.
दत्तात्रय पांढरे पुळुज जिल्हा परिषद
शाळा व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष