सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील सिंहगड इन्स्टिटयूट येथे सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉंलॉजी डेव्हलपमेंट व एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील जनरल सायन्स अँड इंजिनीअरिंग डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान' या विषयाशी निगडित २ री तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली.या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सिल्क फायब्रोइन टेक्सटाइल इंडस्ट्रीज, भविष्यातील इलेक्ट्रॉनिक्ससाठी सिल्क फायब्रोइन, सिल्क फायब्रोइन एक फंक्शनल बायोमटेरियल टिश्यू इंजिनिअरिंग, सिल्क फायब्रोइन - लक्ष्यित औषध वितरणासाठी एक निदान साधन,जखमेच्या उपचार आणि ड्रेसिंगसाठी रेशीम फायब्रोइन,सिल्क फायब्रोइनचा ऊर्जेची कापणी आणि साठवणीमध्ये वापर, रेशीम शेती आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील मूल्य साखळी, रेशीम कीटक आनुवंशिकी, प्रजनन, अंडी उत्पादन, संगोपन, आहार, पॅथॉलॉजी, जैविक मॉडेल म्हणून रेशीम कीटक, रेशीम किडा आणि तुतीचा वापर कापड नसलेल्या कारणासाठी करण्याची शक्यता,सेंद्रिय रेशीम शेती, रेशीम शेतीवर हवामानातील बदल आणि रसायनांचा प्रभाव,मूल्यवर्धित द्विउत्पादन म्हणून सेरीसिन,
नॅनो बायोटेक्नॉलॉजी आणि इतर अनेक नैसर्गिक पॉलिमर, रेशीम शेती संसाधने आणि ग्रामीण विकास,विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासातील प्रगती या विषयावर भर देण्यात आला. यामध्ये
यु.जी.आर.एस.च्या एकूण ३० मुलांनी शोधनिबंध सादर केले. या परिषदेमध्ये १७ वक्त्यांनी आपल्या सिल्क संशोधनावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट चे डायरेक्टर, व डी. वाय पाटील विद्यपीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ संशोधक डॉ. शिवाजी.एच.पवार यांनी आपल्या प्रस्ताविकात रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिल्क हे प्रोटिन्स ने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ठ जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्स पेक्षा सरस ठरते.
याच विषयावर फेब्रुवारी मध्ये १ल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या परिषदेला देशविदेशातील शास्त्रज्ञ, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सिंहगड इन्स्टिट्यूट चे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले व माजी संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले,डॉ. एस. एस. शिरगण, डॉ. विनोद खरात यांचे मार्गदर्शन लाभले.