भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील दिव्यांग जोडपे मंगेश रेवन लिंगे व तृप्ती मंगेश लिंगे या दिव्यांग जोडपे यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी संपन्न झाला होता.
या दिव्यांग जोडप्याने आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस सांगोला येथील विद्यालय वाढदिवस साजरा केला.
यावेळी मंगेश लिंगे म्हणाला की आम्ही जरी दिव्यांग असलो तरी इतर कुटुंबीयाप्रमाणेच आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस गुरुजनांच्या आशीर्वादाने साजरा केला आहे आणि येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांग असलो तरी काळजी न करता मोठ्या धैर्याने अभिमानाने कष्टाने काम करत राहावे हाच संदेश यातून आम्ही देऊ इच्छितो.
या वाढदिवस सोहळ्याचे सर्वांनी कौतुक करून दिव्यांग बांधवांनीही आदर्श घ्यावा अनमोल सल्ला सर्वांच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांना जेवण देण्यात आले.