काशा ते काशिनाथ सर असा 25 वर्षाचा संघर्ष.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रोज संध्याकाळी शिळी भाजी खाणे पासून ते आज 50 विविध भाजी बनविणे व भाकरी फॅक्टरी मालक. उत्तम शहाकारी आचारी,वक्ता,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,सेंद्रिय शेती,युवा उद्योग मार्गदर्शक इथपर्यंत आलो.
सोलापूर, पुणे,गोवा, दिल्ली,मुंबईत येथे 22 ठिकाणी नोकरी केलो. सोलापूर मार्केट यार्डात हमाली केलो,
कॉलेजमध्ये असताना सेन्ट्रीग बिगारी हेल्पर साईट सुपरवाझर,70 फूट रोड येथे,अतनुरे ट्रेडर्स,बोगा किराणा दुकान,रवी ट्रेडर्स,शिंदगी मामा दुकानात काम,गड्डम यांच्या टॉवेल व चादर कारखाना येथे कांडी मशीन,रंगारी काम केले,पहाटे पेपर विकले,विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास घेतले ,लॉक डाउन मास्क व भाजी विकले,महात्मा गांधी शाळेत शिक्षक म्हणून काम केलो, प्रिंटिंग काम केले,दुसऱ्यांच्या शेतात गडी म्हणून पडेल ती काम केले,गावात व भाजीपाला विकले,मंगळवार बाजारात पिशवी विकणे इथपासून अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी दिल्लीत गाजवला असे अनेक काम केलो.
मित्रांनो आजही संघर्ष सुरू आहे या काळात अनेक लोकांनी दिलेले सहकार्य व मार्गदर्शन यामुळे हा
प्रवास सोपं गेले.सोलापूर ते दिल्ली सायकल प्रवास,अखंड 42 तास डॉ कलांम मिशनवर व्याख्यान ते कौशल्य विकास प्रशिक्षक,22 हजार सामाजिक कार्यक्रम घेण्याचे विक्रम,14 जल साक्षरता संमेलन,7 स्पर्धापरीक्षा जागर साहित्य संमेलन, महात्मा बसवेश्वर साहित्य संमेलन असे अनेक उपक्रम घेतले.
अजून मोठी झेप घेणे बाकी आहे.तुमचं आशीर्वाद हवेत
मग येतंय ना!
*सस्नेह निमंत्रण*
ड्रीम फौंडेशन परिवाराचे
24 वर्ष मध्ये
24 वे व्यवसाय फर्म
(सर्व फर्म उत्तम सुरू आहेत)
*श्री सिद्धेश्वर भोजनालय*
या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटचे उदघाटन
माझे आई वडील ,बहीण भाऊ आणि मित्र परिवार यांच्या शुभहस्ते गुरुवार दि 15 ऑगस्ट 2024 रोजी
सकाळी 11,30 वाजता
*रोहिणी नगर भाग एक*
श्री मारुती मंगल कार्यालय जवळ क्रांती मेडिकल शेजारी ओम गर्जना चौक येथे शुभारंभ करीत आहे या कार्यक्रमास उपस्तीत राहून शुभेच्छा द्यावेत अशी विनंती काशिनाथ भतगुणकी मो 7219099955 यांनी केली आहे.