पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, प्रा. समाधान माळी, सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किवा म्ह्टले तर नव्हती अशी परस्थिती होती अश्या खडतर काळात त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानास्पद आहे.
यादरम्यान महाविद्यालयातील एकनाथ इंगवले, दादासाहेब वाघमारे, पांडूरंग परचंडे, योगेश नवले, गणेश माळी, अंकुश आवताडे, दत्तात्रय पवार आदी उपस्थित होते.