पुळूज प्रतिनिधी दत्तात्रय पांढरे तेज न्यूज
पोलीस उपनिरीक्षक शहीद धनाजी होनमाने यांना भारत सरकारकडून दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदक 15 ऑगस्ट ,2024 या स्वातंत्र्य दिवशी जाहीर झाले आहे. लवकरच राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचे शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचे वडील तानाजी होनमाने यांना दिला जाणार आहे.याच्या अगोदर 15 ऑगस्ट 2022 ला पहिले पद मिळाले होते. सलाम त्यांच्या शौर्यगातेला देशभरामध्ये पोलीस दलात किंवा शस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदाराना स्वतंत्र दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते.
यावर्षी सुद्धा 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला महामहिम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात 208 पोलीस शौर्य पदक व 624 गुणवत्ता पूर्व सेवेसाठी पदक जाहीर झाले असून त्यापैकी पुळुज तालुका पंढरपूर येथील शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने यांना शौर्यपदक जाहीर झाल्यामुळे संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान आहे.