सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा प्रगतिशील वैभशील बनवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व सर्व युवा सेना शिवसेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांची संपर्क साधण्यासाठी शिव अभियान भगवा सप्ताह राबवण्य येणार आहे.अशी माहिती शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली.
यासाठी सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीने सदानंद हॉटेल येथे बैठक पार पडली या बैठकीसाठी पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तसेच उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत नाना घाडगे तालुकाप्रमुख मा अरविंद पाटील शिवसेना विधानसभा प्रमुख कमुरद्दीन खतीब युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड युवा सेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले उप तालुका प्रमुख गोरख अजगर गणेश घाडगे हरिभाऊ पाटील शंकर मिटकरी युवा सेनेचे शहर प्रमुख सौरभ चव्हाण समाधान चव्हाण सचिन पाटील अण्णा बंडगर आबा होनमाने अनिल खरात रघुनाथ आईवळे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.