बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवार दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांची रयत शिक्षण संस्था, सातारा येथे सदिच्छा भेट घेतली.
शरदचंद्रजी पवार यांना न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, भाळवणी, ता पंढरपूर येथील संस्थेच्या उदघाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले व त्यावेळी पवार यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य, चेअरमन, न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, भाळवणी व शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या हस्ते “श्रीं” चे उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी प्राचार्य एन. एम. गायकवाड , प्रभारी मुख्याध्यापक रोकडे , ग्रंथपाल उत्तम शिंदे उपस्थित होते.