मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
मायणी तालुका खटाव येथे दरवर्षीप्रमाणे संत सद्गुरु सरुताई मठात गुरुपौर्णिमा निमित्त महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी करण्यात आले आहे ,अशी माहिती ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर यांनी दिली. यादिवशी पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६:३० वाजता नामस्मरण,सकाळी ७ वाजता आरती,सकाळी९वाजता आरती व नामस्मरण, सकाळी १०:३० ला ह.भ.प.गणेश महाराज डांगे यांचे कीर्तन होणार आहे.तसेच दुपारी १२ वाजता माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.डॉ.उर्मिला येळगावकर यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहनही ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
अन्नछत्र,गोशाळा व भक्तनिवास या नियोजित कामासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.