पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारी संपली वारकऱ्यांची मांदियाळी हळूहळू कमी होऊ लागली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा आषाढी सोहळा पंढरपूर मध्ये साजरा होत असतो. विठुरायाच्या भक्तीसाठी तन-मन-धन एकत्र करून महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असतात मात्र एकादशी संपली की प्रश्न निर्माण होतो तो स्वच्छतेचा आणि अशाच या स्वच्छतेकडे लक्ष देणारे सोलापूर भारत स्काऊट गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या सहकार्याने समुदाय विकास प्रकल्प अंतर्गत महास्वच्छता अभियानाचे आयोजन चंद्रभागा वाळवंटामध्ये करण्यात आले होते.
या अभियानास संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास 25 शाळेतील स्काऊट गाईड रोवर रेंजर असे एकूण 770 विद्यार्थी आले होते या स्काऊट गाईडच्या माध्यमातून चंद्रभागा वाळवंटातील जवळपास आठ ते नऊ टन कचरा संकलित करण्यात आला व तो पॉलिथिन पेपर मध्ये पॅक करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाचे अनुकरण करून हा सोहळा काल चंद्रभागा वाळवंटामध्ये पार पडला.
स्वच्छता अभियानाच्या वेळी पंढरपूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी लिगाडे साहेब पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी वाळूजकर साहेब आरोग्य अधिकारी तोडकर साहेब महाराष्ट्र राज्याचे स्काऊट प्रशिक्षण आयुक्त श्री गोविंद केंद्रे साहेब जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री यादव सर जिल्हा संघटक श्री मोरे साहेब जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिरसाठ मॅडम रोवर लिडर प्राध्यापक सुधाकर कांबळे व सर्व युनिट लीडर उपस्थित होते.