पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते_ प्रशालेत आज शैक्षणिक वर्ष 2024-2025 सत्रातील 15 जून हा शाळेचा पहिला दिवस! प्रशालेत प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत करुन त्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला.
पहील्याच दिवशी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाबरोबरच प्रशालेतर्फे नवोदित विद्यार्थ्यांना स्वागत भेट म्हणून वही,पेन व गुलाबपुष्प देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न म्हणून गुळ-शेंगदाणा यांचे पौष्टिक लाडू देण्यात आले. प्रशाला व परिसराला फुगे आणि फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्याने आनंद आणि चैतन्याचे वातावरण पसरले होते.
नवोदित विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा हा आनंददायी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे,पर्यवेक्षक रणजित शिनगारे,विलास दराडे,जैनुद्दीन शेख,राजेंद्र जाधव, सुरेश कट्टे, धनंजय भाजीभाकरे,देवदत्त वाघ,नितीन वायदंडे,श्रीकांत चंदनशिवे,नवनाथ लोणकर, प्रथमेश गावडे,गणेश खिलारे,गणेश पाटील, महेश देशमुख, बबन कोकतरे, श्रीराम खूपसे, नितीन झांबरे,चेळेकर,सविता इंगळे, वैशाली म्हेत्रे,प्रतिभा जावीर,सरस्वती शिंदे,अंजली कापसे,कोळसे,जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे,किरण बोधले,धनाजी देठे, विष्णूपंत घोगले,समाधान शेजाळ, संदीप चौधरी, राजाराम घोडके, विजय पंडीत, रोहित हेंबाडे, सुजित मोरे,संजय निंबाळकर,बाळू बनसोडे, बबन पवार,भीमा खंडाळे व सर्व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.