- वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कल्याण समितीची बैठक हिंगोलीत संपन्न
हिंगोली प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समितीच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार देण्याचे काम केले जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली. हिंगोली येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत श्री पाटणकर बोलत होते.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंब कल्याणकारी समिती कामकाजाला सुरुवात झाली. रविवार १६ जून रोजी हिंगोली येथे या समितीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणीस विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार व विभागाचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समिती बाबतची रचना व कार्यपद्धतीची माहिती श्री पाटणकर यांनी या बैठकीत दिली. कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, खजिनदार राजेंद्र टिकार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
संघटनेच्या प्रत्येक विभागातून एक सदस्य या समितीवर घेण्यात आला आहे. हे सदस्य व विभागाचे पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य एकत्रित येऊन प्रत्येक जिल्ह्यातील एका सदस्याचा सहभाग करीत विभागनिहाय उपसमिती गठीत करतील. संघटनेच्या सातही विभागातील या उपसमित्या ३१ ऑगस्ट पर्यंत गठीत करायच्या आहेत. त्यानंतर १५ सप्टेंबर अखेर या उप समितीची बैठक घेऊन अहवाल राज्य संघटनेला पाठवण्याचा आहे.
यावेळी समितीचे सदस्य संजय पावसे, ज्ञानेश्वर इंगळे ,राजेंद्र हलवाई, मनीष वासनिक उपस्थित हे होते. सुभाष अपूर्वा यांनी आभार मानले. या बैठकी यशस्वी आयोजन हिंगोली पेपर विक्रेता संघटनेचे सचिव हरीश कीर्तीवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाचमासे, कोषाध्यक्ष शेख शकील? राज्य कार्यकारणी सदस्य काशिनाथ कदम ,गजानन तडवणकर, माणिक पंडित ,धबडगे ,विनोद जोशी ,राहुल खिल्लारे,राघोजी टापरे , पांडुरंग भोयर यांनी केले. सर्व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.