महिला उद्योजकांसाठी अर्थकारणाच्या माध्यमातुन महिलांची प्रगती व्हावी
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
टूर ट्रॅव्हल्स एजन्सी, हाऊस बोट, टेंट हाऊस, पर्यटन व्हिला, साहसी पर्यटन केंद्र, होम स्टे, रिसॉर्ट, ट्री हाऊस, आदिवासी/निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, योगा केंद्र असे पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो.
"आई" महिला केंद्रीत पर्यटन धोरणा अंतर्गत व्याज परतावा कर्ज योजनेअंतर्गत 15 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर पर्यटन विभागाच्या वतीने रू. 4.50 लाख पर्यंत (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजाचा परतावा हा लाभार्थ्याला त्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत आधारकार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, उद्योग आधार, प्रकल्प अहवाल, LOI पात्रता प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीष ताठे यांनी केले तर आभार गणेश हरिदास व निरजंन रूपलग यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन सतिश मुळे, संचालक हरिष ताठे, अमित मांगले, ऋषिकेश उत्पात, डॉ.संगिता पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, आनंदा नाईकनवरे कर सल्लागार व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.