सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. मन्सूरअली अ. अझीझ काझी यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मॅथेमॅटिक्स विषयातील पी. एच. डी. ची पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. काझी यांनी गणितातील गुंतागुंतीच्या अशा ' सम ऍस्पेक्ट्स ऑफ इंटिग्रोडीफ्रंशिअल इक्वेशन्स' या विषयावर आपला शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सादर केला.त्यांना पी. एच. डी चे मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.एम. टी. गोफणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. एच. ठकार, पुणे विद्यापीठाचे गणित विषयाचे प्रा. एस. डी. केंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे गणित विभागाचे डॉ.के. डी. कुचे व इतर प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या ह्या संशोधनासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ व्ही व्ही खरात यांचे सहकार्य लाभले. काझी यांना विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा पी. एस. पाटील यांच्या हस्ते पी एच डी चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ.मन्सूरअली काझी यांच्या या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री. संजय नवले, माजी कुलगुरू तथा सिंहगड संशोधन केंद्राचे संचालक ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ एस. एच. पवार प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.आर. टी. व्यवहारे, उपप्राचार्य डॉ. एस. एम. जगदे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.विनोद खरात यांनी अभिनंदन केले.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक सिद्धांत 'डिफ्रेन्शीयल इक्वेशन्स'च्या माध्यमातून मांडून ते सूत्रबद्ध केले जातात. किंबहुना क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे सिद्धांत सूत्रबद्ध करणे हेच गणितज्ञांनी मोठे आव्हान असते. डॉ. मन्सूरअली काझी सध्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सोलापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात.या अवघड विषयावर पी. एच. प्राप्त केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.