पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकाच्या गजरात फुले उधळून औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेबाहेर फुग्यांची सजावट,रांगोळ्या,पानाफुलांच्या कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.पाठय पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.चिंतामणी उत्पात,संस्थेचे सचिव ऍड. ज्ञानेश आराध्ये, सदस्य प्रशांत कुलकर्णी सर,रेखाताई भालेराव,शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्या,शिशुविहारच्या मुख्याध्यापिका आदिती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी पाठयपुस्तके मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.संस्थेच्या संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.राजश्री घंटी यांनी प्रास्ताविक केले. सौ.सप्ताश्व व सौ.लोणारकर यांनी इशस्तवन सादर केले. सौ.गोरे यांनी पाहुण्यांचा परिचय केला तर सौ.रानडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन डॉ.केसकर यांनी केले.सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी नवीन गणवेशात अत्यंत उत्साहात आज शाळेत उपस्थित होते.विद्यार्थ्यांना जिलेबी आणि चॉकलेटस असा खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. सतीश पुरंदरे,माजी अध्यक्षा मा. वीणाताई जोशी,सदस्या मा. रेखाताई उंबरकर,डॉ.अनिल जोशी,माजी आमदार प्रशांत परिचारक, डॉ.तेजस भोपटकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.