मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल वांद्रे येथे नुकतेच नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ दिनांक १५ जून पासून सुरू झाले.यावेळी येथील विद्यार्थ्यांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक सर फिलिप आणि सर्व उपस्थित शिक्षकांच्या वतीने करण्यात आले.
या वर्षासाठी Edu Sprint या थीमनुसार आपण सर्वांनी स्वतः फायर असायला हवे म्हणजेच स्वतः स्वतःला कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी मोटिवेट करायला हवे.उंच भरारी मारण्याची ताकद आपल्यात असून आपल्या कलागुणांना नेहमीच आपण अग्रस्थान द्यायला हवे..आपण पुढाकार घेऊन मोटीवेट झालो तर इतर अनेकजण सुद्धा नक्कीच पुढे येतील आणि नेहमीच आपण चांगल्या कामासाठी एकत्र यायला हवे.चार विविध रंगांचे फुगे दिसायला जरी वेग वेगळे असले पण ते जेव्हा एकत्र येतात उंच भरारी घेतात तेव्हा एक वेगळाच नजारा तयार होतो. एकत्र आल्याने आपण निश्चितच आपले ध्येय अधिक स्पष्टपणे यशस्वीपणे गाठू शकतो असे फादर निकी आपल्या भाषणात म्हणाले.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी देखील शिक्षकांसाठी त्यांना बुस्ट करण्यासाठी एका खास सेमिनारच आयोजन शाळेने केलं होते.यावर्षी शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याने सर्वच आनंदित आणि खुश होते.यासाठी सर्वांचेच आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी यावर्षीचे थीम साँग आणि फ्लॅग लाँच करण्यात आले. टीचर प्रिया हटकर यांनी आजच्या विशेष प्रार्थना सभेसाठी पुढाकार घेतला होता.