सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते. आर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक नरेंद्र पलाटी व नितेश झांबरे यांनी पतंजली महर्षींनी सांगितलेले योगसुत्रे मधील यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार,धारणा,ध्यान व समाधी आदींचे महत्व सांगून सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले व प्रात्यक्षिक करुन दाखवली.
यावेळी प्रचार्य रविशंकर कुंभार म्हणाले, योगा केल्याने आरोग्याचे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.शरीर, मन आणि श्वास यांचे एकत्रिकरण होऊन मानसिक शांती व समाधान मिळते म्हणून सर्वांनी दररोज योगा करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार,सुर्यकांत बिराजदार, अशोक पाटील व प्रकाश कोरे यांचे सहकार्य लाभले.