सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होत्या.यावेळी आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या स्वयंसेविका प्रमुख पाहुणे शिरीषा गुंडेली, शारदा बोमेन, कीर्ती बुरा यांनी वज्रासन, ताडासन, शवासन,भुजंगासन, पद्मासन, चक्रासन प्राणायाम, सुर्य नमस्कार आदी आसनाचे प्रात्यक्षिके सादर केले व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकेत सहभाग करुन घेतले.
मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठल्यावर भूमातेच्या नमस्कारानंतर आई वडिलांचे पाया पडावे.आपल्या गुरुंना स्मरण करुन योगासने प्राणायाम करावे.दररोज आसने केल्यावर आपण आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण ठेवू शकतो. मनावर ताबा असणारे मुले खूप हुशार असतात. योगासनामुळे आपल्या आरोग्य चांगले सुदृढ बनते. आपण निरोगी राहतो. आपली बुद्धी वाढते .दररोज सर्वांनी पंधरा ते वीस मिनिटे योगासन केले पाहिजे असे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिरीषा गुंडेली यांनी सांगितले.
यावेळी बसवराज बिराजदार, लक्ष्मण कांबळे, हणमंत कुरे, विशाल खाडे, बजरंग शिरसाट, अमोल गुड्डेवाडी, मल्लिकार्जुन बिराजदार, किरण साळुंखे, रविकांत पोतदार, श्रेयस बिराजदार, महेंद्र वाघमारे, नागेश कळंत्री,सुजाता फुलारी, शितल चमके, उज्वला भांड, शारदा लोमटे, आशाराणी गायकवाड, वंदना तेली, गौरी रेके, मंगल स्वामी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुजर यांनी केले .