शिवशक्ति विरशैव लिंगायत सामाजिक बहूउद्देशिय संस्था अकलूज यांचे वतीने आयोजन....महेश डिकोळे
सोलापूर जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाज्यातील सर्वांसाठी...
अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवार दिनांक-25.06.2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महादेव मंदिर,बसवेश्वर पथ,अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कर्ज वितरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि आनंद मालुसरे बसवेश्वर महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आयोजित करण्यात आले आहे.तसेच सोलापूर येथील महामंडळाचे सबंधित अधिकारी आणि तहसिलदार माळशिरस यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय एक दिवसीय संपन्न होणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाज्यातील सर्वांनी सहभागी होवून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवशक्ति संस्थेचे अध्यक्ष महेश प्रकाश डिकोळे यांनी केले आहे.
📌अर्जदारांनी शिबीरमध्ये सहभागी होताना OBC प्रवर्गातील जातीचा दाखला , व्यवसाय साठीचे कोटेशन आणि तहसीलदार यांचा उत्पन्नाचा व डोमिसाईल दाखला व इतर आवश्यक KYC कागदपत्र सोबत घेवून उपस्थित राहावे.
📌सर्वांनी आपापले कागदपत्र तयार करून ठेवावे...शिबीरच्या दिवशी मुळ कागदपत्र जमा केले जाणार आहेत.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :-
8888348861 / 7020147615