भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
यावेळी प्राचार्य एन एम गायकवाड, बी सी भोगले, डी एच यादव या सेवानिवृत्त शिक्षकांचा फेटा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी बारावीच्या परीक्षेमध्ये अंजली लोखंडे,प्रगती शेंडे ,प्रीती माळवदे,अमृता शिंदे तसेच दहावीच्या परीक्षेमध्ये प्रतीक्षा पासले, प्रणाली झांबरे, शांभवी निराळी या विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश संपादन केलेले आहे या विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी एस डी रोकडे,एस जी जरे, आर एम दडस,के के जाधव,जी डी जमदाडे,पी एस जमदाडे,एस के काळे,पी एच पाटील,बी ए विधाते, आय ए कुंबरे,तुकाराम खरात,उत्तम शिंदे,आर बी झांबरे,एस आर जाधव,विद्यार्थी पालक शिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.