मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
आवताडे उद्योग समूह संचलित आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.नंदूर या साखर कारखान्याचा या गळीत हंगाम २०२४-२५ हंगामातील रोलर पूजन श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ मार्गदर्शक विष्णुपंत बाबुराव आवताडे यांच्या हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून दोन गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. अगदी त्याच पद्धतीने या चालू वर्षातील गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वीपणे पार पाडा असा कार्यमंत्र श्री. संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, टेक्निकल सरव्यवस्थापक सुहास शिनगारे चिफ केमिस्ट मोहन पवार, एच आर मॅनेंजर ज्ञानेश्वर बळवंतराव, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, चिफ अकौंटंट बजरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, डे.चिफ इंजिनिअर प्रताप मोरे, डे.चिफ केमिस्ट सोमनाथ ढावरे, स्टोअर किपर महेश इंगळे, पर्चेस मॅनेजर अजित सरवळे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, सहा.सुरक्षा अधिकारी रणजीत पवार अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रोलर पूजन उदघाटक विष्णुपंत आवताडे यांचा आवताडे शुगरचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, खाते प्रमुख व कर्मचारी यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील जीवन वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.