जळगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिंपी समाजाचा जाहीर पाठिंबा देश राष्ट्र धर्म व समृद्ध विकसित भारताच्या प्रगतीसाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज जळगाव येथे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर, प्रदेशाध्यक्ष अॅड महेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर विभागीय अध्यक्ष विवेक जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांना आज सकाळी जळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जळगाव ,रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ, खा. रक्षाताई खडसे यांना जाहीर पाठिंबा दिला.