पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभा मतदारसंघ व मित्र पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील व पुणे शहर व ग्रामीण भागात कामानिमित्त स्थायिक झालेले नागरिक यांच्याकरिता पुणे येथील नवले लॉन्स येथे 27 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास जास्तीत जास्त सोलापूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे निरीक्षक समाधान काळे यांनी केले आहे.
या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.