इंदापूर प्रतिनिधी
काटी.तालुका इंदापूर येथील अमोल मोहिते यांची पोलीस उपअधीक्षक (Dy.SP) म्हणून निवड झाली आहे. अमोल यांनी आजपर्यंत विक्रीकर निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी, उपअधीक्षक भूमिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त अशा विविध पदावर त्यांची निवड झाली आहे.राज्यसेवा परीक्षा 2022 मधून राज्यात 57 वी रँक घेऊन पोलीस उपअधीक्षक पदी निवड होण्याचे स्वप्न पूर्ण केले. काटी येथील दहावी 2008 माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्या वतीने अमोल मोहिते यांची निवड झाल्याबद्दल यथोचित नागरी सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थी मित्र परिवारातील नोकरी,व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असणारे सदस्य उद्योजक इंजिनिअर मयूर राऊत,विकास मिसाळ, प्रशांत मासाळ,अक्षय गुळवे,संतोष कचरे, अविराज मासाळ,रोहित हेगडे,सचिन दडस,गणेश गोसावी, विशाल खटके(पोलिस उपनिरीक्षक,मुंबई),सुबोध भोसले, शिक्षिका प्रियांका भोसले,सुप्रिया भोंग, इंजिनिअर राणी मिसाळ, इंजिनिअर वर्षा ढगे(अमेरिका),मंदाकिनी बारवकर (पुणे पोलिस), यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पूजा गोरे मोहिते (ना.तहसीलदार), अॅड.संग्रामदादा नरुटे, रणजीत मासाळ, तेजस पाटील, राजू साळुंखे, महादेव कचरे,उन्मेश शिंदे,किरण गायकवाड, सलमान मुलाणी, संदीप किसवे, नितीन वडापुरे, विजय पांढरमिसे,गोरख परांडे, आबा पडसळकर, युवराज पाटील, रणजित पवार, तुषार राऊत, संदीप मोहिते, दीपक मोहिते, प्रसाद पडसळकर,चंदू शेळके,सागर घुसाळकर,राहुल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.