पंढरपूर प्रतिनिधी
अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली संलग्न महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला दिनांक ६:९:२०२३ रोजी समस्त शिंपी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागाकडे महेश ढवळे यांनी सतत पाठपूरावा करून संबंधित विभागाकडे शेवट पर्यन्त पाठपुरावा करत होते.
त्याला यश येत असून या प्रमुख मागण्यां 1) संत नामदेव महाराजांची जयंती शासकिय स्तरावर साजरी करणे 2) पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या स्मारकाचे कामसूरू सुरू करणे तसेच समाजातील शिवणकाम कारागीर, विद्यार्थी ,यांच्या साठी विविध योजना सुरू करणे अशा १५ मागण्यां विषयी शासनस्तरावरून संबदित विभागाने शिंपी समाजाच्या मागण्या संदर्भात महाराष्ट्र कक्ष अधिकारी डॉ. प्रकाश धारवे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
काल महेश ढवळे यांना संबंधित विभागाचे पत्र दिले असून समाजातील प्रमुख मागण्या आता लवकरच मंजूर होतील अश्या आशा पल्लवित झाल्ये असल्याचे अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ राज्य संघटक मनोज भाडांरकर यानी या पत्रकाद्वारे दिले आहे.