पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेचा 44 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनी युक्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.उद्घाटन प्रमुख पाहुणे कवी रामचंद्र इकारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मनोज मच्छिंद्र गायकवाड,संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर,प्रा.शिवाजी वाघ,ॲड.वैभव टोमके, अजित नडगिरे,सलीम वडगावकर,दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल,सौ. सुनीता मोरे,प्राचार्य सुधाकर पिसे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी नृत्य,नाट्य, एकांकिका,लोकगीते, लेझीम,आदिवासी नृत्य, लावणी,देशभक्तीपर गीते, रॅप,रिमिक्स,पथनाट्य, मुकनाट्य,विनोदी बातम्या अशा विविध कलांचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.सामाजिक व प्रबोधनात्मक विषयांवर सादरीकरण करुन कलाकार विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना श्रीकांत चंदनशिवे, गणेश खिलारे, देवदत्त वाघ, श्रीराम खूपसे,जैनुद्दीन शेख,बबन कोकतरे, संदीप चौधरी,सविता इंगळे,प्रतिभा जावीर,अंजली कापसे यांनी मार्गदर्शन केले.ग्रामस्थांतर्फे चांगल्या शालेय कार्याबद्दल प्राचार्य सुधाकर पिसे यांचा सत्कार सप्तशृंगी फायनान्सचे चेअरमन अतुल चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला.त्यांचेकडून पर्यावरणाचे संवर्धन व समतोल राखण्यासाठी "एक मुल, एक झाड" या अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून भेट देण्यासाठी आंब्याची रोपे प्रशालेला देण्यात आली.बौद्धिक ,कला व क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विविध वस्तू पारितोषिक व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सामाजिक व वैचारिक विषयांवर कलासादरीकरण केल्याने विद्यार्थ्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रत्येक विद्यार्थ्यांना कला रसिकांनी,माता-पिता पालकांनी भरभरून दाद दिली.प्रशालेच्या यशवंत विद्यार्थ्यांसाठी रुपये पंधरा हजार कायम ठेव म्हणून मधुकर सिताराम दबडे(मुंढेवाडी ता.पंढरपूर) यांनी प्रशालेला सुपूर्द केले. तुंगतचे रामकृष्ण नागणे यांनी दरवर्षी चित्रकला विषयासाठी रुपये दोन हजार देण्याचा मानस व्यक्त करुन ती रक्कम प्रशालेला सुपूर्द केली.
पाहुण्यांचे स्वागत समाधान शेजाळ, प्रास्ताविक प्रथमेश गावडे अध्यक्षीय निवड श्रीराम खूपसे आणि
अनुमोदन महेश देशमुख यांनी दिले.पाहुण्यांची ओळख राजेंद्र जाधव,जैनुद्दीन शेख यांनी करुन दिली.अहवाल वाचन प्राचार्य, सुधाकर पिसे यांनी केले.रोख पारितोषिक यादी वाचन नितीन वायदंडे, सरस्वती शिंदे,वस्तू पारितोषिक यादी वाचन गणेश खिलारे,श्रीकांत चंदनशिवे,संदीप चौधरी, राजाराम घोडके,प्रथमेश गावडे यांनी केले.
सुत्रसंचालन सविता इंगळे,प्रतिभा जावीर, सरस्वती शिंदे,अंजली कापसे यांनी केले.आभार जेष्ठ शिक्षक विलास दराडे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख श्रीराम खूपसे, समाधान शेजाळ,धनंजय भाजीभाकरे,महेश देशमुख, सुरेश कट्टे,नवनाथ लोणकर, गणेश पाटील,ज्येष्ठ लिपीक राजकुमार ढगे,किरण बोधले,संजय निंबाळकर,विष्णूपंत घोगले,धनाजी देठे,विजय पंडित,रोहित हेंबाडे, बबन पवार,बाळू बनसोडे,भीमा खंडाळे,नाना माने आदींनी परिश्रम घेतले.दोन दिवसीय कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी,पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता अंजली कापसे यांनी पसायदानाने केली.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.