माळशिरस प्रतिनिधी
पोलीस ठाणे यांच्या वतीने वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी शुक्रवार रोजी शाळा परिसरात मोटर सायकल वरून फिरणाऱ्या, शाळेच्या लगत थांबणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाईबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली.
वेळापूर शहरातील शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडी प्रकरणातून रोडरोमीओचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर क ड क कारवाई करण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी तसेच वेळापूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी शहरातील इंग्लिश स्कूल , सहकार महर्षी जुनिअर कॉलेज, पालखी चौक वेळापूर बस स्थानक या परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या रोड रोमियोंवर बारीक नजर ठेवून इंग्लिश स्कूल वेळापूर व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर येथून रोड रोमिओ यांना शाळेत लगत फिरताना ताब्यात घेऊन खाक्या वर्दीचा प्रसाद देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . रोड रोमियो बाबत पोलीस खात्याकडे पालक वर्ग, विद्यार्थिनी तसेच शिक्षक यांच्या तक्रारी नुसार सदर रोड रोमिओवर पोलीसी खाक्या दाखवून प्रसाद मिळाल्याने रोड रोमिओ मध्ये भीती निर्माण झाली.
वेळापूर पोलीस स्टेशनने रोड रोमिओवर केलेल्या करावी बद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे व अशाच कारवाया पोलीस खात्याने नेहमी कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.