भाळवणी प्रतिनिधी
8 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार शिरोमणी वसंतराव काळे दादा यांची 80 वी जयंती प्रशालेत साजरी करण्यात आली.
चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हणमंत जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय काळे यांनी दादांचा जीवनपट आपल्या मनोगतातून व्यक्त केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास चौगुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सहकार्य केले.