पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज सुमारे 25 ते 30 हजार लोक येऊन दर्शन घेऊन जातात यामध्ये दमेकरी वृद्ध अपंग आदी भक्तांचा भाविकांचा समावेश असतो या सर्वांना मंदिरात आत जाणे अवघड होते याकरता मंदिर समितीने माधवी निगडे प्रतिष्ठान वतीने दिलेल्या रिक्षा त्वरित भक्तांच्या सेवेत मंदिर समितीने चालू केल्याने वारकरी भाविकातून समाधान व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके व व्यवस्थापक pudalvad यांना लेखी निवेदन देऊन दर्शना करता येणाऱ्या वृद्ध अपंग हृदयविकाराने त्रस्त दमेकरी भाविक वारकरी यांचे सोई करता दर्शनाअर्थी वरील लोकांना किमान चौघड्यापर्यंत तरी आणून सोडावे तेथून त्यांना उतरलेल्या ठिकाणी रिक्षाने वाहनाने जाता येईल.
याबाबतचे लेखी निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे तालुका संघटक महेश भोसले श्रीराम साळुंखे यांनी लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून कशा पद्धतीने रिक्षा चालू करता येईल हेही सांगितले होते या सर्वांची निवेदनाची दखल घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने रिक्षा वृद्ध अपंग दमेकरी यांचे सोय करता नामदेव पायरी तुकाराम भवन व्हीआयपी गेट या ठिकाणी या रिक्षाची सोय केली आहे यापुढेही नवीन इलेक्ट्रॉनिक रिक्षा घेण्याचा समितीचा विचार असून जास्तीत जास्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वारकरी भाविक भक्तांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे असे कार्यकारी अधिकारी शेळके यांनी सांगितले.
भाविक भक्तांच्या सोयीकरता मंदिर समितीने रिक्षा चालू केल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास सचिव सुहास निघते जिल्हा संघटक इरकल प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरती तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये उपाध्यक्ष कुमार देशपांडे सचिव महेश भोसले दिलीप पांडे सदस्य याने समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.