सोलापूर प्रतिनिधी
शालेय विभागस्तर सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करीत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या गौरव परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. या स्पर्धेत पदक प्राप्त खालील विद्यार्थ्यांची ठाणे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरावर निवड झाली.
तेजस कलागते सुवर्णपदक
पवन कुमार चकोले सुवर्णपदक जयवर्धन गवळी सुवर्णपदक भारती चिंता रौप्यपदक विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल आणि राज्यस्तरावरील निवडीबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर, भीमाशंकर पटणे, गुरुराज माळगे, मल्लिकार्जुन कळके व समन्वयक संतोष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक योगेश राऊत पर्यवेक्षक शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.