सोलापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय लायन संघटना प्रांत 32 34 ड-1 या प्रांतामधील लायन्स क्लब ऑफ सोलापुर ट्विन सिटी अर्थात जुळे सोलापूर चे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी सन 2022 23 या वर्षांमध्ये अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या नेतृत्वाखाली क्लबने दैदीप्यमान उस्फूर्त भरारी घेतली.
असून या वर्षांमध्ये त्यांनी
बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द झोन
बेस्ट प्रेसिडेंट ऑफ रिजन
बेस्ट प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट
बेस्ट प्रेसिडेंट ऑफ मल्टिपल
इंटरनॅशनल प्रेसिडेंट अॅप्रिसिएशन अवार्ड
यांच्यासह अनेक विविध पुरस्कार मिळवले आहेत. एकूणच त्यांच्या वर्षभराचा विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल लायन्स इंटरनॅशनल च्या वतीने त्यांना लायन संघटनेचा अत्यंत मानाचा समजला जाणारा इसामी गॅट चॅम्पियन क्लब प्रेसिडेंट अवॉर्ड व तसेच लायन इंटरनॅशनल क्लब एक्सलेंस अवॉर्ड नुकताच जाहीर झाला होता याचे वितरण सोलापूर मध्ये झालेल्या विभागीय परिषदेमध्ये मल्टिपल व्हॉइस चेअरमन राजशेखर कापसे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर उपप्रांतपाल एम. के. पाटील, उपप्रांतपाल-2 वीरेंद्र चिकले माजी प्रांतपाल अशोक मेहता व विभागीय सभापती राजेंद्र शहा कासवा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारामुळे लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी च्या विविध सेवा कार्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून या अभूतपूर्व यशाबद्दल लायन्स सह समाजाच्या विविध स्तरातून अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे व लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी या क्लब वर कौतुकाचे वर्षाव होत आहे.