पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात येणा-या एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी प्रविष्ट असणारे 41 विद्यार्थी उत्तम ग्रेडने उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.एलिमेंटरी परीक्षेसाठी 24 तर इंटरमीजिएट परीक्षेसाठी 17 विद्यार्थी प्रविष्ट होते.
इंटरमीजिएट परीक्षेमध्ये कार्तिकी आण्णासाहेब शेळके, वैष्णवी संभाजी करपे, प्रतिक्षा दत्तात्रय चव्हाण,स्नेहा नामदेव चव्हाण, मयुरी सिद्धेश्वर चव्हाण,स्नेहल भागवत वाघमारे,पायल भीमा खंडाळे,अनघा किशोर पवार, गायत्री संतोष नागटिळक, अस्मिता शंकर चव्हाण, अनुष्का नवनाथ सपाटे,महेक शाहीद मुलाणी,राहुल नागेश जाधव या विद्यार्थ्यांना 'ए' ग्रेड मिळाली असून स्नेहल दादासो पवार,विद्या प्रशांत चव्हाण, सिद्धार्थ परमेश्वर कांबळे,आर्यन रविंद्र चव्हाण या विद्यार्थ्यांना 'बी' ग्रेड मिळाली आहे.
तर एलिमेंटरी परीक्षेत अंबिका अतुल आंबेकर, समीक्षा समाधान चव्हाण, षष्ठी आबासो गायकवाड, रणजीत रामदास देशमुख या विद्यार्थ्यांना 'बी' ग्रेड मिळाली असून गौरी संतोष नागटिळक, गौरी नेताजी करपे, ऐश्वर्या गणेश चव्हाण, स्नेहा रामचंद्र नागणे, वृषाली शिवाजी जाधव, श्रेया सचिन फडतरे, जान्हवी जालिंदर चव्हाण, षष्ठी नवनाथ चव्हाण, तनया विलास चव्हाण, सोनाक्षी अभिमान चव्हाण, श्रेया दत्तात्रय पाटील, साक्षी नवनाथ ठवरे, साक्षी शांतिनाथ चव्हाण, संस्कार रघुनाथ गायकवाड, ओंकार संभाजी काळे, कृष्णा राम सावंत, संग्राम परमेश्वर कांबळे, ओंकार अर्जुन पवार, कृष्णा संभाजी पवार, प्रज्वल पुरुषोत्तम गायकवाड या विद्यार्थ्यांनी 'सी' ग्रेड मिळवून यश संपादन केले आहे.एस. एस.सी बोर्ड परीक्षेत या वाढीव कला गुणांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.त्यांना कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेतील यशवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासो चोपडे, मुकुंद देवधर, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर,सुनिता मोरे तसेच प्रशालेचे प्राचार्य, प्रा.सुधाकर पिसे व पर्यवेक्षक, रणजित शिनगारे, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.