शेळवे प्रतिनिधी
अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर च्या वतीने वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष जे.बी.गायकवाड यांनी शेळवे कृषि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र झालेल्या सर्व (२६) विद्यार्थ्यांचा प्रशालेमध्ये सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक एम एम गाजरे सर , सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.