पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पंढरपुरातील प्रसिद्ध अँड. अमोल देसाई व उद्योजक हेमंत कुलकर्णी उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना अँड. अमोल देसाई म्हणाले की मुलांनी खेळाचा आनंद घ्यावा .आपले शरीर आणि मन मजबूत व्हायचे असेल तर आपण खेळ खेळले पाहिजेत. क्रीडांगण आपणाला जीवन शिक्षण देते. तर श्री हेमंत कुलकर्णी यांनी, मुलांना दररोज किमान एक तास तरी मैदानावर घालवण्याचे आव्हान केले. खेळ व अभ्यासाची सांगड घातली तरच आपण यशस्वी होऊच शकतो ,असे ते म्हणाले. मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. महेश भोसले सर, श्री अशपाक मुजावर सर, श्री दिनेश आगावणे सर श्री सोमनाथ साळुंखे सर , सौ कदम मॅडम ,जगदाळे मॅडम यांनी परिश्रम घेतले