सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी (बी एस )होते यावेळी राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष पदी समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या सूचनेनुसार राम हुंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
शहरातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकारांच्या विषयावर निवेदन आंदोलने उपोषणे व पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे सोलापूर शहरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर नूतन अध्यक्ष राम हुंडारे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शाहनवाज कंपली राजाभाऊ पवार मल्लिनाथ कोळी चंद्रशेखर निम्मल दत्तात्रय कोळी रविकांत रणदिवे युनूस आतार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.